Eknath Shinde Update : शिवसेनेचा आणखी मोठा नेता शिंदे गटात सामील?

एमपीसी न्यूज : शिवसेनेला आणखी मोठा धक्का (Eknath Shinde Update) लागण्याची शक्यता आहे. कारण आमदार उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत हातमिळवणी केली आहे. उदय सामंत आता गुवाहाटीला रवाना झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनीही बंडखोरीची भूमिका घेत रविवारी गुवाहाटीला रवाना झाले. जिथे ते शिंदे छावणीत सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही पुष्टी समोर आलेली नाही.

तसे झाल्यास शिंदे गटात (Eknath Shinde Update) सामील होणारे महाराष्ट्र सरकारचे 8 वे मंत्री असतील. ते महाराष्ट्र सरकारमध्ये उच्च व तंत्र शिक्षण या विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. ते शिवसेना पक्षाच्या तिकिटावर रत्‍नागिरी विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.

MVA च्या अजगराच्या विळख्यातून माझी सुटका – शिंदे

शुक्रवारी वडोदरा आणि दिल्लीचा दौरा केल्यानंतर एकनाथ शिंदे शनिवारी सकाळी गुवाहाटी येथे पोहोचले. शनिवारी संध्याकाळी त्यांनी शिवसैनिकांना उद्देशून ट्विट केले. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, प्रिय शिवसैनिकांनो,
नीट समजून घ्या, म.वि.आ. चा खेळ ओळखा..! MVA च्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे. हा लढा तुम्हा शिवसैनिकांच्या हिता करीता समर्पित…. आपला एकनाथ संभाजी शिंदे. एकनाथ शिंदे सध्या गुवाहाटी, आसाममध्ये तळ ठोकून आहेत. जिथून ते महाराष्ट्रातील शिवसेना सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत.

Eknath Shinde : एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांविरोधात कोथरूडमध्ये आंदोलन

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.