शनिवार, ऑगस्ट 20, 2022

Talegaon Dabhade News : मैदानी कसरतीच्या स्पर्धांमध्ये चैतन्य इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा उत्साह

एमपीसी न्यूज – हिंद विजय नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक व तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष रवींद्र दाभाडे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना वाव देण्यासाठी रविवारी (दि. 26) घेण्यात आलेल्या भंडारा डोंगर चढण्याच्या स्पर्धेत इंदोरी येथील चैतन्य इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई) च्या विद्यार्थ्यांचा उत्साह दिसून आला. कोरोनाच्या कालावधी नंतर देखील विद्यार्थ्यांमध्ये मैदानी कसरतीसाठी उत्साह असल्याचे यातून दिसून आले.

या स्पर्धेत सहभाग घेण्यास विद्यार्थी कडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला व तब्बल दोन वर्षानंतर विद्यार्थांनी क्रीडांगणात स्पर्धा सरावासाठी तयारी केली, वेळ खूपच कमी होता पण स्पर्धेत सहभागी होण्याची इच्छा मात्र प्रबळ होती.

Maharashtra Political Crises : शिंदेसेना वि. शिवसेना वाद कोर्टात; आज सर्वोच्च न्यायलयात सुनावणी

या स्पर्धेत इयता 9 वीचा विद्यार्थी कु. साहिल रात्रे व इयता 10 वी चा विद्यार्थी कु बिशु रावत यांनी प्रत्येकी चौथा व पाचवा क्रमांक पटकावला. दोघाचे ही शाळेच्या व्यवस्थापन समिती, मुख्यध्यापिका व शिक्षक वृंद यांच्याकडून कौतुक झाले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्ध्यांचे सुद्धा कौतुक करण्यात आले.

रवींद्र दाभाडे याच्या या अभिनव उपक्रमाद्वारे पुन्हा एकदा भंडारा डोंगर विद्यार्थ्यांच्या जयघोषाने दुमदुमला.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून, चैतन्य इंटरनॅशनल स्कूल (CBSE), इंदोरीचे संस्थापक भगवान शेवकर यांनी रवींद्र दाभाडे याचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला व त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी सदिच्छा व्यक्त केली आणि अशा प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्याचे मनोबल वाढवण्यासाठी खूप गरजेचे आहेत असे विचार मांडले. यावेळी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य विठ्ठल शिंदे, भंडारा डोंगर दशमी समितीचे अध्यक्ष साहेबराव तथा बाळासाहेब काशिद, पै तानाजी काळोखे आदी मान्यवर उपस्थित होते.

spot_img
Latest news
Related news