Pune News : पुण्यात फौजदाराची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातील मंचर पोलीस ठाण्यातील एका सहाय्यक पोलीस फौजदाराने गळफास घेऊन आत्महत्या केली. खेड तालुक्यातील चांडोली गावात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एकनाथ ठकाजी वाजे असे आत्महत्या केलेल्या फौजदाराचे नाव आहे. पाच दिवसांपूर्वी वाजे यांच्या मुलीचा विवाह पार पडला होता, मात्र त्यानंतर उघडकीस आलेल्या त्यांच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्याप कळू शकले नाही.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, एकनाथ वाजे यांनी शेजारी असणार्‍या मोकळ्या फ्लॅटमध्ये स्वतःला कोंडून घेतले होते. बराच वेळ झाला तरी ते दरवाजा उघडत नसल्याने त्यांच्या कुटुंबियांनी दुपारी साडेतीनच्या सुमारास दरवाजा तोडून पाहिले असता एकनाथ वाजे यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले. खोलीतील बेडरूममधील हुकला दोरी बांधून त्याने गळफास घेतला होता.

दरम्यान कुटुंबियांनी तातडीने त्यांची दोरी सोडून खाली उतरवले आणि तात्काळ जवळच असलेल्या ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

पाच दिवसांपूर्वीच वाजे यांच्या मुलीचा विवाह पार पडला होता, त्यांच्या मुलीने प्रेमविवाह केला होता, त्यानंतर काहीच दिवसात ही दुखःद घटना घडली.  दरम्यान अचानक घडलेल्या या प्रकारानंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. खेड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून याप्रकरणी पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.