Pune Crime News : दहशतवादी जुनैदला 10 दिवसांची कोठडी,10 मोबाईल,5 फेसबुक खाती वापरत असल्याचे निष्पन्न

एमपीसी न्यूज – दहशतवाद विरोधी पथकाने पुण्यातील दापोडी परिसरातून लष्कर ए तैय्यबा या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या आरोपावरून जुनैद मोहम्मद याला अटक केली होती. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. जुनैद वेगवेगळे दहा मोबाईल क्रमांक वापरत असल्याचे समोर आले आहे तसेच, तो पाच फेसबुकखाती देखील वापरत संपर्कात राहत होता.

याप्रकरणात काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने जुनैद मोहम्मदला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

माहितीनुसार, जुनैद मोहम्मद याने भारतातील काही महत्त्वाच्या ठिकाणांची तसेच गर्दी असणाऱ्या ठिकाणांची रेकी केल्याचा संशय आहे. तसेच, त्यांच्याकडून घातपाती कारवाया होण्याची दाट शक्यता वर्तविली जात असून, त्यानुसार आता त्याच्याकडे चौकशी केली जात आहे. यादरम्यानच जुनैदने काही काळातच दहा सिमकार्ड वापरले आहेत. तेही वेगवेगळ्या कंपन्यांचे आहेत. प्रत्येक संवाद झाल्यानंतर तो हे सिमकार्ड तोडून फेकून देत असत. त्यानंतर त्या सिमकार्डचा तो वापर करत नव्हता. अशा प्रकारे त्याने आतापर्यंत दहा सिमकार्ड वापरल्याचे समोर आले आहे.

प्रत्येकवेळी संवाद करण्यासाठी तो नवीन सिमकार्डचा वापर करत होता. त्यासोबतच त्याने या सिमकार्डच्या माध्यमातून वेगवेगळे पाच फेसबुकखाती काढली होती. त्यातून तो देशविरोधी आक्षेपार्ह पोस्ट टाकणे तसेच त्या माध्यमातून तरुण मुलांशी संपर्क करून त्यांना लष्कर ए तैय्यबा या अतिरेकी संघटनेत भरती करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे काम करत होता.

तरुणांच्या मनात धार्मिक वैमनस्यता निर्माण करण्याचे तो काम करत होता. त्याच्याकडे संघटनेत तरुण मुलांना भरती करण्याचा तसेच त्यांच्या मनात देशविरोधी भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, त्याच्या खात्यावर दोन वेळा पाच-पाच हजार रुपये आले होते, त्याने ते काढून देखील घेतल्याचे निदर्शनास आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.