Bhosari News : कंपनीतील केमिकल मिश्रित मटेरियलला आग

एमपीसी न्यूज – कंपनीतील केमिकल मिश्रित मटेरियलला आग लागल्याची घटना गुरुवारी (दि. 16) सायंकाळी भोसरी एमआयडीसी मधील इन्फिनिया सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत घडली. ज्वलनशील द्रवरूप केमिकलमुळे आग वारंवार भडकत असल्याने अग्निशमन विभागाला ही आग नियंत्रणात आणताना अनेक अडचणी आल्या.

भोसरी एमआयडीसी परिसरात इन्फिनिया सायन्सेस प्रायव्हेट लिमिटे ही कंपनी आहे. कंपनीत गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता अचानक आग लागली. पिंपरी चिंचवड अग्निशमन विभागाला वर्दी प्राप्त होताच पिंपरी मुख्य अग्निशमन केंद्राचे दोन व भोसरी उप अग्निशमन केंद्राचा एक असे एकूण तीन बंब घटनास्थळी दाखल झाले.

कंपनीत हेक्सेन (Hexene) केमिकल मिश्रित स्क्रॅप मटेरियलला लागली होती. ज्वलनशील द्रवरूप केमिकलमुळे आग वारंवार भडकत होती. त्यावरती अग्निशमन केंद्राकडील फोम वापरून आगीवरती फोमचे अच्छादन घालून स्मोदरींग पद्धतीने आग पूर्णपणे विझवण्यात आली.

या आगीमधील केमिकल प्लास्टिक मटेरियल तसेच रेक्झिन बनवण्याकरिता वापरले जाणारे साहित्य जळाले. ज्यामुळे विषारी धूर निर्माण होतो व डोळ्यांची आग होणे व श्वसनास त्रास संभवतो. अग्निशमन दलाने तत्परतेने व त्वरीत आगीवर नियंत्रण मिळविले. घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.