Pune News : दरोडा टाकण्याच्या तयारीत असणारे पाच सराईत गुन्हेगार जेरबंद

एमपीसी न्यूज : पुण्यातील लोणीकंद परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या पाच सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. रात्रीच्या वेळी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना आडवून लुटमार करण्याच्या तयारीत असतानाच ही कारवाई करण्यात आली.

राजन गोपाल नायर, राहुल गोटीराम साळुंखे, तायप्पा कानडे, अक्षय मधुकर कोळके आणि सुरज दिलीप जाधव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून लोखंडी कोयता, चाकू, मिरची पूड, नायलॉनची दोरी, मोबाईल आणि मोपेड असा 78 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या सर्व आरोपीवर यापूर्वी जबरी चोरी आणि शरीरातविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेचे पोलीस गस्त घालत असताना पिंपरी सांडस गावाजवळील एका बांधकाम प्रकल्पाच्या साईट जवळ काही जण जमले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गणेश माने यांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून या सर्वांना पकडले त्यांच्याजवळची घातक शस्त्रे जप्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.