Dehu Road Crime News : पालखी सोहळ्यातील भाविक महिलेचे मिनी गंठन चोरले; चारजण ताब्यात

एमपीसी न्यूज – पालखी सोहळ्यातील भाविक महिलेचे मिनी गंठण चोरणाऱ्या चार जणांना पोलिसांनी लगेचच ताब्यात घेतले आहे. शनी मंदिरजवळ महिला पालखीचे दर्शन घेत असताना हा प्रकार घडला. 

सुनिल म्हस्के (वय 25 वर्षे), विलास धोत्रे (वय 25 वर्षे), संतोष म्हासळकर (वय 26 वर्षे) आणि नागेश पवार (सर्व रा. पाथर्डी, जिल्हा अहमदनगर) यांना याप्रकरणी अटक केली आहे. याबाबत 46 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

Bhosari Robbery Case : भोसरीत जबरी चोरी; एकजण गंभीर जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी पालखी शनी मंदिरजवळ आली असताना दर्शनासाठी गेल्या. त्यावेळी 73,096 रुपये किंमतीचे 2 तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठण जे चैन मध्ये विणलेले होते ते आरोपींनी गर्दीचा फायदा घेत हिसकावून नेले.

Maharashtra Political Crisis : शिवसैनिक भरडला गेला, उद्धव ठाकरेंचा प्रस्ताव शिंदेंनी फेटाळला, 4 मुद्द्यात भूमिका केली स्पष्ट

याप्रकरणी आरोपींच्या विरोधात देहू रोड पोलिस ठाण्यात भा. द. वि. कलम 392, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तात्काळ चारही जणांना ताब्यात घेतले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.