Crime News : मूसेवाला खून प्रकरणातील संशयित संतोष जाधवच्या टोळीतील चौघांना पोलीस कोठडी

एमपीसी न्यूज – सिद्धू मूसेवाला खून प्रकरणातील संशयित आरोपी संतोष जाधव याच्या टोळीतील चार जणांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.एका व्यावसायिकाकडे 50 हजार रुपयांची खंडणी मागत ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चौघांना अटक केली होती.

जीशान इलाहीबक्ष मुंडे (वय 20), वैभव उर्फ भोला शांताराम तिटकरे (वय 19), सचिन बबन तिटकारे (वय 22) आणि रोहित विठ्ठल तिटकरे (वय 24) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.या सर्वांना 29 ऑगस्टपर्यंत मोक्का कोठडी सुनावण्यात आली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी संतोष जाधव याच्यासह बारा जणांविरोधात नारायणगाव पोलीस ठाण्यात मोक्का कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे.नारायण गावातीलच एका व्यावसायिकाने याप्रकरणी तक्रार दिली होती.संतोष जाधव यांनी व्हाट्सअप कॉल करून 50 हजार रुपये खंडणीची मागणी या व्यावसायिकाकडे केली होती.तसेच एका साथीदाराला या व्यावसायिककडे पाठवून खंडनी न दिल्यास ठार मारण्याची धमकीही दिली होती, असे या व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीत म्हटले होते.

पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी जिशान, वैभव, सचिन आणि आरोपी रोहितला अटक केली. त्यांना विशेष न्यायालयात हजर केले.आरोपींनी पिस्तुले कशासाठी आणली होती याचा तपास करण्यासाठी आणि त्यांनी बेकायदा जमा केलेल्या मालमत्तेचा शोध घेण्यासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील यांनी केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.