Chinchwad : चार वाहनचोरांकडून 18 मोटारसायकल जप्त

वाहनचोरी विरोधी पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वाहनचोरी विरोधी पथकाने चार वाहनचोरांना अटक केली. त्यांच्याकडून 10 लाख 30 हजार रुपयांच्या 18 मोटारसायकल आणि एक टेम्पो जप्त केला आहे. या कारवाईमुळे 11 पोलीस ठाण्यातील 16 वाहन चोरीचे आणि दोन एटीएम मशीन फोडण्याच्या प्रयत्नाचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

प्रविण गोरक्षनाथ गाडे (वय 26, सध्या रा. बाकी, ता. खेड, जि. पुणे. मुळ रा. सावरगावतळे, ता. संगमनेर, जि. अहमदनगर), नितिन मच्छिंद्र नेहे (वय 23, रा. सावरगावतळे, ता. संगमनेर, जि. अहमदनगर), निखिल बाळसाहेब गाडे (वय 24, रा. सावरगावतळे, ता. संगमनेर, जि. अहमदनगर), हरीष लक्ष्मण गाडे (वय 27, सध्या रा. आळंदी, पुणे. मुळ रा. सावरगावतळे, ता. संगमनेर, जि अहमदनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक गिरीश चामले यांचे पथक म्हाळुंगे परिसरात गस्त घालत असताना पोलीस नाईक सचिन उगले आणि विनोद साळवे यांना माहिती मिळाली की, महिंद्रा कंपनीसमोर तीन इसम येणार आहेत. त्यांच्याकडे असलेली दुचाकी चोरीची आहे. त्यानुसार पोलिसांनी महिंद्रा कंपनीच्या गेटवर सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच संशयित तिघेजण पळून जाऊ लागले. पोलिसांनी शिताफीने पळून जाणा-या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या मोटारसायकल बाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी गुन्हे शाखा युनिट तीनच्या कार्यालयात आणून तिघांकडे कसून चौकशी केली असता त्यांच्याकडे असलेली मोटारसायकल चोरीची असल्याचे सांगितले.

आरोपी प्रवीण याने त्याचा साथीदार मित्र हरीश याच्यासोबत मिळून संगमनेर, आळेफाटा, मंचर, सिन्नर, खेड, चिखली, पिंपरी, चिंचवड, निगडी, हिंजवडी परिसरातून चोरल्याचे सांगितले. आरोपींकडून वेगवेगळ्या कंपन्यांच्या 18 मोटारसायकल जप्त केल्या. आरोपी प्रवीण आणि निखिल या दोघांनी खालुंब्रे व खेड भागात एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला आहे. त्या गुन्ह्यासाठी त्यांनी वापरलेले साहित्य आणि एक टेम्पो देखील पोलिसांनी जप्त केला.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पदमनाभन, सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) सुधिर हिरेमठ, सहा पोलीस आयुक्त (गुन्हे-1) राजाराम पाटील, सहा पोलीस आयुक्त (गुन्हे-2) श्रीधर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानूदास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सतिश कांबळे, पोलीस उप निरीक्षक गिरीश चामले, पोलीस कर्मचारी हजरत पठाण, विवेकानंद सपकाळे, दादा पवार, रमेश गायकवाड, विनोद साळवे, सचिन उगले, अरुण नरळे,  गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस कर्मचारी सचिन मोरे, जमिर तांबोळी, राजकुमार हनमंते, योगेश कोळेकर, योगेश आढारी, त्रिनयन बाळसराफ, सागर जैनक, महेश भालचीम, विठठल सानप, गंगाधर चव्हाण, नाशा केकाण, राहुल खारगे यांच्या पथकाने केली.

या कारवाईमुळे उघडकीस आलेले वाहनचोरीचे गुन्हे –

# हिंजवडी पोलीस ठाणे – 1
# निगडी पोलीस ठाणे – 1
# चिखली पोलीस ठाणे – 2
# तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे – 1
# संगमनेर शहर पोलीस ठाणे – 4
# संगमनेर तालुका पोलीस ठाणे – 1
# मंचर पोलीस ठाणे – 2
# आळे फाटा पोलीस ठाणे – 1
# सिन्नर पोलीस ठाणे – 1
# कोतवाली, अहमदनगर पोलीस ठाणे – 1
# खेड पोलीस ठाणे – 1

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.