Hinjawadi Crime News : महापोर्टल परीक्षेसाठी डमी परिक्षार्थी बसवल्याबद्दल दोघांवर फसवणुकीचा गुन्हा 

एमपीसी न्यूज – 2019 मध्ये घेण्यात आलेल्या महा पोर्टल परीक्षेसाठी डमी परिक्षार्थी बसवल्याबद्दल दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी तहसीलदार माधुरी आंधळे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.26) फिर्याद दिली आहे. त्यानुसार संदीप धनसिंग गोलवाल (रा. हसनबादवाडी, औरंगाबाद) व डमी परीक्षार्थी वर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2019 मध्ये महा पोर्टल परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी आरोपी संदीप गोलवाल याने डमी परीक्षार्थी बसवला होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर दोघांवर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.