Pune Crime News : बँकेतून बोलत असल्याचे सांगून 1 लाख 86 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज : बँक ऑफ बडोदा मधून बोलत असल्याचे सांगून क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती जाणून घेऊन  एका ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यातून एक लाख 86 हजार रुपये परस्पर काढून घेतले.

_MPC_DIR_MPU_II

एका ज्येष्ठ नागरिकांनी दिलेल्या तक्रारीनंतर सिंहगड रस्ता पोलीस स्टेशन मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रवींद्रनाथ बाळकृष्ण कुरलेक (वय 76) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मोबाईल क्रमांकावर एका अनोळखी नंबरवरून फोन आला. मी बँक ऑफ बडोदा, एलबीएस रोड पुणे या शाखेतून त्रिपाठी बोलत असल्याचे त्याने सांगितले. तसेच तुमचे क्रेडिट कार्ड बंद होणार आहे असे सांगून त्यांनी फिर्यादी यांच्या क्रेडिट कार्डची संपूर्ण माहिती घेतली. त्यानंतर त्यांच्या दोन सेविंग खाते मधून 1 लाख 86 हजार 900 रुपये काढून घेत त्यांची फसवणूक केली आहे. अधिक तपास सिंहगड पोलिस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.