India Corona Update : देशातील बाधितांची संख्या दिड कोटींच्यावर ; 24 तासांत 2,73,810 नवे रुग्ण 

एमपीसी न्यूज – देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस नवा उच्चांक गाठत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 2 लाख 73 हजार 810 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, मागील पाच दिवसांत जवळपास बारा लाखांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 50 लाख 61 हजार 919 एवढी झाली आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 1 कोटी 29 लाख 53 हजार 821 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 1 लाख 44 हजार 178 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

चिंताजनक बाब म्हणजे देशात सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, सध्या 19 लाख 29 हजार 329 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मागील 24 तासांत 1 हजार 619 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 1 लाख 78 हजार 769 जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.18 टक्के एवढा आहे‌. देशाचा रिकव्हरी रेट सध्या 86 टक्के एवढा झाला आहे.

देशात आजवर 26 कोटी 78 लाख 94 हजार 549 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 13 लाख 56 हजार 133 चाचण्या रविवारी (दि.18) करण्यात आल्या आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 12 कोटी 38 लाख 52 हजार 566 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.