Pune News : घराशेजारी राहणाऱ्या तरुणाकडून विवाहितेचा विनयभंग, आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज : घरा शेजारी राहणाऱ्या एका 24 वर्षीय तरुणाने 32 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला. सहकार नगर पोलिस स्टेशन मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटकही करण्यात आली आहे. पद्मावती येथील तळजाई वसाहत येथे हा प्रकार घडला. 

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी अधिक माहिती अशी की फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांचे ओळखीचे आहेत. रविवारी रात्री फिर्यादी या त्यांच्या कुटुंबासमवेत घरामध्ये झोपल्या होत्या. आरोपी खिडकीतून डोकावून पाहत होता.

त्याला विचारणा करण्यासाठी फिर्यादी यांनी दरवाजा उघडला असता आरोपीने त्यांच्यासोबत अश्लील चाळे करत त्यांच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. यावेळी फिर्यादीने आरडाओरडा केला असता आरोपीने फिर्यादी आणि त्यांच्या पतीला शिविगाळ केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.