Drama : जी. ए. कुलकर्णी यांना इंग्रजी नाट्याविष्काराद्वारे वाहणार आदरांजली!

एमपीसी न्यूज – जी. ए. कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त तळेगावातील कूहम रेपर्टरी ऑफ आर्ट्सच्या कलाकारांनी त्यांना आदरांजली म्हणून त्यांच्याच ‘यात्रिक’ या कथेचा ‘डॉन किहोटे- द ट्रॅव्हलर’ हा इंग्रजी नाट्यविष्कार सादर करण्याचे ठरविले आहे.पुण्यात एरंडवणे येथे तीन ऑक्टोबरला या नाटकाचा प्रयोग होणार आहे.

प्राणोती पंचवाघ काळे यांनी ‘डॉन किहोटे- द ट्रॅव्हलर’ हे इंग्रजी भाषांतर  केलेले आहे. यातील कलाकार सुनील उंडे, राजीव कुमठेकर, केशर कुंभावडेकर, कौस्तुभ ओक, सतीश ढेंबे हे आहेत. या नाटकाचे नाट्यरूपांतर आणि दिग्दर्शन सतीश ढेंबे यांनी केले आहे.

‘जीए’ यांच्यासारख्या अगदी वेगळ्या धाटणीच्या कथाकाराच्या कथांवर नाटक करणं फार अवघड असं काम आहे आणि ते काम तळेगावमध्ये सतीश ढेंबे यांनी 2003 मध्ये मराठीमधून जीए यांच्या यात्रिक या कथेचं नाट्यरूपांतर करून, त्याचं दिग्दर्शन करून ती प्रेक्षकांसमोर आणली होती.आता त्याच कथेचं इंग्रजी रूपांतर ते आपल्यासमोर घेऊन येत आहेत.या नाटकाचे संगीत विनायक लिमये यांनी केले आहे.प्रकाशयोजना राहुल लमखडे यांनी केली आहे. या नाटकांमध्ये मेकअपचे काम अरविंद सूर्या हे करतात.

जीए ज्यांना समजू शकतील, जीए ज्यांना माहिती आहे किंवा ज्यांना जीवनाच्या आध्यात्मिक आणि व्यवहारिक इतर सगळ्याच कांगोऱ्यांचा गाढा अभ्यास आहे, अशा जी ए कुलकर्णी यांच्या विषयी बोलावं तेवढं आणि लिहावं तेवढं कमी आहे.एक अत्यंत शब्दांचा जादूगार भावनांना अत्यंत वेगळ्या पद्धतीने स्पर्श करणारा तुमच्या डोक्यात कित्येक वर्ष तरळत राहणारा विचार कागदावर मांडण्याची विलक्षण शक्ती असलेल्या ‘अवलिया’ जी. ए. कुलकर्णी यांची आपण जन्मशताब्दी साजरी करतोय त्यानिमित्ताने त्यांना आदरांजली म्हणून आपण हा नाट्य प्रयोग इंग्रजीमध्ये वेगळ्या पद्धतीने तो सादर करत आहोत, असे सतीश ढेंबे यांनी एमपीसी न्यूजशी बोलताना सांगितले.

या नाटकाचा प्रयोग तीन ऑक्टोबरला पुण्यात एरंडवणे येथे होणार आहेत तर या प्रयोगाला आपण नक्कीच प्रतिसाद द्या. अधिक माहितीसाठी सतीश ढेंबे यांच्याशी 9075641491 या क्रमांकावर संपर्क साधावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.