Pune Crime : दहशत पसरवणारा कुख्यात गुंड कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध

एमपीसी न्यूज : शिवाजीनगर, फरासखाना तसेच हडपसर परिसरात दहशत माजविणाऱ्या आणखी एका सराईत गुन्हेगारावर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. त्याला कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे.(Pune Crime) पोलीस आयुक्तांची एमपीडीए कायद्यांतर्गत केलेली ही दुसरी कारवाई आहे. ऋषीकेश सुनिल बागुल (वय 24 रा. कामगार पुतळा, शिवाजीनगर) असे कारवाई करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

Pune News : जबरदस्तीने लग्न करून संबंध ठेवले अन् अश्लील व्हिडीओ तयार केला, गुन्हा दाखल

उमेश हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. कोयता तसेच इतर घातक शस्त्राने गंभीर दुखापत करणे, बेकायदाशिर पिस्तूल बाळगणे यासारखे गुन्हे दाखल आहेत.(Pune Crime) पाच वर्षात त्याच्यावर 5 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्याने सार्वजनिक सुव्यस्थेस बाधा निर्माण झाली होती. त्यामुळे त्याच्यावर एमपीडीएनुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्यानूसार त्याच्यावर कारवाई केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.