Dighi Robbery Case : अज्ञात चोरट्याने लांबविले 1.11 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने; गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – दिघी (Dighi Robbery Case) येथे जबरी चोरीची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत अज्ञात चोरट्याने 1.11 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लांबविले आहे. ही घटना 14 ते 15 जून दरम्यान घडली आहे. 

याप्रकरणी धोंडीराम खडे (वय 57 वर्ष, रा. दिघी) यांनी दिघी (Dighi Robbery Case) पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Todays Horoscope 19 June 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी खडे वगळता यांचे कुटुंबीय घटना घटली तेव्हा घरी नव्हते. धोंडीराम खडे त्या दिवशी कामाला जाताना कुलूप न लावता दरवाजा पुढे ओढून ड्युटीला निघून गेले. दरम्यान, दरवाजा उघडाच राहिल्याने एका अज्ञात चोरट्याने दरवाजा उघडून घरात सहज प्रवेश केला आणि घरातील 1,10,900 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने फिर्यादी यांच्या घरातून लंपास केले. याप्रकरणी दिघी पोलिस आणखी तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.