Ashadhi Wari 2022 : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात वैष्णवांना एसपीओ, पोलीस मित्रांची साथ

एमपीसी न्यूज –  जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान उद्या (दि. 20 जून) देहू येथून होणार असून मंगळवारी (दि. 21 जून) निगडी येथे आगमन होणार आहे. कोरोना काळात सलग दोन वर्षे पायी वारी (Ashadhi Wari 2022) सोहळा स्थगित झाल्याने यंदा वारकरी मोठ्या संख्येने देहूत येण्याची शक्यता आहे. वैष्णव मोठ्या संख्येने पालखी सोहळ्यात सहभागी होण्याची शक्यता असल्याने प्रशासन सुद्धा अलर्ट मोड मध्ये आहे. यावेळी पोलीस विभाग सुद्धा सतर्क झाला असून सोहळा सुरक्षित पार पाडण्यासाठी वाहतूक स्वयंसेवक, एस पी ओ, पोलीस मित्रांची सुद्धा मदत घेतली जाणार आहे.

निगडी येथील प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या पोलीस मित्र, विशेष पोलीस अधिकारी सदस्यांबरोबर  पालखी आगमनानिमित्त (Ashadhi Wari 2022) निगडी वाहतूक विभागाची  बैठक नुकतीच पार पडली. बैठकीस निगडी वाहतूक विभागाच्या पोलीस निरीक्षिका विजया कारंडे, प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील, संपर्क प्रमुख विजय मुनोत, महिला अध्यक्षा अर्चना घाळी, संतोष चव्हाण, विभावरी इंगळे, लक्ष्मण इंगवले, सतीश देशमुख, बाबासाहेब घाळी,शशिकांत इंगळे, बळीराम शेवते, भरत उपाध्ये, राजू येळवंडे,विशाल शेवाळे,राजेश बाबर, सतीश मांडवे,अजय घाडी,सुशेन येरूनकर, तेजस सापरिया, विजय जगताप,नितीन मांडवे,साक्षी पवार,उद्धव कुंभार, संजय महाजन,संजय लोखंडे,संतोष शिंदे,संजय कांबळे,संजय थोरात हे प्रमुख उपस्थित होते.

Dighi Robbery Case : अज्ञात चोरट्याने लांबविले 1.11 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने; गुन्हा दाखल

बैठकीत पो. नि. विजया कारंडे म्हणाल्या, “कोरोना महामारीच्या कठीण कालखंडानंतर यंदा पायी वारी पालखी सोहळा संपन्न होत आहे. दोन वर्षे महाराष्ट्र राज्यातील तसेच परराज्यातील बहुसंख्य वारकरी म्हणजेच वैष्णव पालखी सोहळ्यात पायी देहू ते पंढरपूर वारी करू शकला नाही. यंदाच्या वर्षी संक्रमण कमी प्रमाणात असल्यामुळे पालखी वारीमध्ये मोठ्या संख्येने वारकरी सहभागी होण्याची शक्यता आहे .त्याकरिता संस्थेचे पोलीस मित्र दरवर्षीप्रमाणे पोलीस विभागास नक्कीच सहकार्य करतील. नेमून दिलेल्या प्रत्येक चौकामध्ये बंदोबस्ताकरीता कार्यरत असतील.

Assam Flood : आसाममध्ये पुरामुळं जनजीवन विस्कळीत, 28 जिल्ह्यांना फटका, पंतप्रधानांचे मदतीचे आश्वासन

प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले, “यंदाच्या वर्षी तुकाराम बीज सोहळ्यात तीन लाखापेक्षा जास्त वैष्णव देहूत उपस्थित होते. गर्दीचा हा अनुभव लक्षात घेता, देहू नगरीत यंदाच्या पालखी सोहळ्यास मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्यमध्ये थोडी वाढ दिसून येत असून देहूत वैष्णवांनी मास्क वापरल्यास वारी नक्की सुरक्षित असेल, त्यामुळे ह्या वर्षी सुद्धा समितीच्या वतीने मास्क चे वाटप केले जाणार आहे. या संदर्भात देहूरोड पोलीस ठाण्याच्या वरीष्ठ पोलीस निरीक्षिका वर्षाराणी पाटील व पोलीस अधिकारी यांचे उपस्थितीत देहूमध्ये मास्क वाटप मोहिम राबविली जाणार आहे तसेच निगडीतील प्रमुख चौकात समितीचे एसपीओ, पोलीस मित्र दिनांक 20, 21, 22 ह्या तीनही दिवशी बंदोबस्तात सहभागी असणार आहेत. वैष्णवांना वैदयकीय मदत सुद्धा दिली जाणार आहे. यंदाच्या वर्षी समितीचे 165 स्वयंसेवक सहभागी असणार आहेत.”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.