Yashomati Thakur : जनतेची कामे न करणाऱ्या अधिकाऱ्यांची परेड – मंत्री यशोमती ठाकूर

एमपीसी न्यूज – जनतेची कामे मार्गी लावणे हे अधिकाऱ्यांचे पहिले काम आहे. काढण्याची मला सवय आहे, त्यामुळे अधिकाऱ्यांनी वेळीच सावध व्हावे असा सज्जड दम महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी चाकण (ता. खेड) येथे भरला. चाकण मध्ये शनिवारी (दि. १८ जून रोजी ) आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळाव्यात मार्गदर्शन करताना मंत्री ठाकूर बोलत होत्या.

ठाकूर (Yashomati Thakur) पुढे म्हणाल्या की, महिलांनी कुठल्याही प्रकारचा छळ, अन्याय सहन करता कामा नये. अन्यायाचा वेळीच प्रतिकार केला पाहिजे. अनेकदा महिलांवर जवळच्या व्यक्तीकडून अन्याय होत असल्याचे देखील त्या यावेळी म्हणाल्या. सोनिया गांधी व राहुल गांधींची ईडीच्या माध्यमातून चौकशी सुरु आहे, या बाबत माध्यमांनी मंत्री यशोमती ठाकूर यांना विचारले असता, वेगवेगळ्या यंत्रणांचा दुरुपयोग केंद्र शासन करत आहे. आमच्या नेत्याला हात लावला तर आम्ही बघून घेऊ असे देखील मंत्री ठाकूर यावेळी म्हणाल्या.

Ashadhi Wari 2022 : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात वैष्णवांना एसपीओ, पोलीस मित्रांची साथ

चाकण येथे राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्या उपस्थितीत खेड तालुका काँग्रेस व काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला तत्पूर्वी चाकण माणिक चौक ते मार्केट यार्ड पर्यंत मंत्री ठाकूर यांनी महिलांबरोबर पदयात्रा व मिरवणुक यात सहभाग घेऊन छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून मेळाव्यामध्ये आगमन झाले.

 

दरम्यान, मंत्री ठाकूर यांनी त्यांचे भाषणात सांगितले की, देशात सुरु असलेल्या हुकूमशाहीला आता आरे ला कारे उत्तर दिले जाईल तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त महाविकास आघाडीच्या योजनांचा प्रचार व प्रसार जनतेत जाऊन करावा यासाठी लागेल ती मदत सरकार करण्यास तयार आहे. आज देशात महागाईने महिलांचे घरगुती आर्थिक गणित कोलमडले आहे याबाबत जनतेला उत्तरदायी होऊ नये म्हणून केंद्र सरकार रोज काहीना काही गोष्टी व कुरापती करत असून जनतेची दिशाभूल करत आहे.

Ashadhi Wari: ‘नाथां’च्या पालखी सोहळा प्रस्थानाला एक दिवस शिल्लक; वारकरी आंदोलनाच्या पवित्र्यात

याप्रसंगी मंत्री ठाकूर यांनी महिला व बाल विकास विविध योजना उपक्रम याची माहिती दिली तसेच नगर विकास विभागाने दिनांक 29 मार्च 2022 रोजी नगर विकास विभागाने केलेल्या शासन निर्णयानुसार जे जे उपक्रम महिला व बालकांसाठी निश्चित केलेले आहे त्यात या उपक्रमात त्यापैकी शक्य तेवढे उपक्रम नगरपरिषद नगरपंचायत यांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करायचे आहेत अशी तंबीही त्यांनी यावेळी प्रशासनाला दिली व प्रसंगी जनतेची कामं न करणाऱ्या अधिकाऱ्यांची मी स्वतः जनतेसमोर परेड घेईल त्यामध्ये दोषी असणाऱ्या अधिकारी यांच्यावर कारवाई केली जाईल असे खडे बोल त्यांनी प्रशासनाला सुनावले.

त्यामुळे एकंदर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मंत्री ठाकूर यांच्या आक्रमक पवित्र्याने नवचैतन्य निर्माण झाले असल्याचे तालुका महिला अध्यक्ष गीता मांडेकर यांनी यावेळी सांगितले.

या वेळी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सावलख्खे,आमदार संग्राम थोपटे,आमदार संजय जगताप, किरणताई काळभोर,संगिता तिवारी, पुजा आनंद, उत्कर्षा रूपवते, वंदना सातपुते, गीता मांडेकर,संग्राम मोहळ,महेश ढमढेरे, चंद्रकांत गोरे, सतीश राक्षे, सुभाष होले, आनंद गायकवाड,अमोल दौंडकर, अमोल जाधव, ॲड. निलेश कड, दिपक थिगळे, धनेश म्हसे, उमेश रानवडे, ॲड,गणेश शहाणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते यात महिलांची संख्या लक्षणीय व नोंद घेण्यासारखी होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.