Hadapsar Police: पोलीस तपासात सराईतांकडून घरफोडीतील 17 तोळे सोने जप्त

एमपीसी न्यूज – घरफोड्या करणाऱ्या तीन सराईतांना अटक करत पोलीस तपासात त्यांच्याकडून 17 तोळे सोने जप्त करण्यात आले आहे. हि कारवाई हडपसर पोलिसांनी 23 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत केली.

अक्षयसिंग बिरुसिंग जुनी (वय.19 रा.हडपसर) व याचे साथीदार जितसिंग उर्फ जितुसिंग राजपालसिंग टाक (वय 26 रा.हडपसर) व लकिसिंग गब्बरसिंग टाक (वय.19 रा.हडपसर) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर पोलिसांनी अक्षयसिंग याला शिताफीने 23 जुलै रोजी अटक केले. यावेळी त्याच्याकडे तपास केला असता, त्याने घरफोडी साथीदार जितुसिंग व लकिसिंग यांच्या साथीने केल्याचे कबुल केले. पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता जितुसिंग व लकिसिंग हे दोघे बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी उस्मानाबाद कारागृहात शिक्षा भोगत असल्याचे समजले.

MPC News Podcast 9 August 2022 : ऐका…आजचे एमपीसी न्यूज पाॅडकास्ट

हडपसर पोलिसांनी त्यांची रिमांड उस्मानाबाद पोलिसांकडून स्वतःकडे घेतली. त्यानंतर पोलिसांनी तीनही रोपींची पोलीस तपासणी घेतली असता त्यांनी घऱफोडीच्या गुन्ह्यात चोरलेले 8 लाख 96 हजार रुपयांचे 17 तोळे सोने, 800 ग्रॅम चांदी व गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण 11 लाख 96 रुपयांचा एवज जप्त केला आहे. हडपसर पोलीस याचा पुढिल तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.