Chikhali News : हातगाडीवाल्यांचा रस्त्त्यावरच ठिय्या

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिक्रमण पथक कारवाईसाठी आल्यानंतर चिखलीतील हातगाडीवाल्यांनी रास्ता रोको केला. अतिक्रम पथकातील अधिका-यांना मारहाण केल्याचा आरोप करत हातगाडी वाल्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला होता. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

चिखली साने चौक परिसरातील फुटपाथवर, भाजीमंडई समोर हातगाडीवाले बसतात. त्यामुळे रस्त्यावरुन जा-येजा करणा-या नागरिकांना अडथळा निर्माण होतो. वाहतूक कोंडी होते. त्यामुळे महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे पथक या हातगाडीवाल्यांवर कारवाईसाठी आज (मंगळवारी) गेले होते.

कारवाईदरम्यान अतिक्रमणच्या अधिका-यांनी मारहाण केल्याचा आरोप करत हातगाडीवाल्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला होता. त्यामुळे काहीवेळ वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान पोलिसांनी हातगाडीवाल्यांनी रस्त्यावर उठविले आणि रस्ता मोकळा केला. तर, महापालिकेच्या अधिका-यांनी हे आरोप फेटाळले आहेत. आम्ही हातगाडी स्वतहून काढण्याचे हातगाडीवाल्यांना सांगत होतो. ते काढण्यास नकार देत होते असे अधिका-यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.