Hinjawadi : अल्पवयीन मुलीची छेड काढून विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पाठलाग करून अल्पवयीन मुलीला रस्त्यावरच मिठी मारत विनयभंग करणाऱ्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा (Hinjawadi) दाखल करण्यात आला आहे. ही घटना 12 जून रोजी ताथवडे येथे घडली होती. याप्रकरणी रविवारी (दि.4) हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

अभिषेक अंकुश सोनमणकर (वय 19 रा.वाकड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून महिलेने याविषयी पोलीसात तक्रार दिली आहे.

Chikhali Theft Case : पर्स हिसकावणाऱ्या चोरट्याला नागरिकांनी पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या 12 वर्षाच्या मुलीला आरोपी हा इन्स्टाग्रामवरून मेसेज करून जून महिन्यापासून त्रास देत होता. मुलीने कोणतीच प्रतिक्रिया न दिल्याने आरोपीने तिचा पाठलाग सुरु केला. यावेळी त्याने मुलीला रस्त्यात अडवून तिच्यावर प्रेम असल्याचे सांगितले, मात्र तिने (Hinjawadi) कोणतीच प्रतिक्रीया न देता तिथून निघून जात असताना त्याने तिला तिच्या इच्छेविरुद्ध मिठी मारत तिचा विनयभंग केला. यावरून आरोपीवर बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.