Chikhali Theft Case : पर्स हिसकावणाऱ्या चोरट्याला नागरिकांनी पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज – महिलेची पर्स (Chikhali Theft Case) हिसकावून पळून जाणाऱ्या चोरट्याला शिताफीने पकडून नागरिकांनीच पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही घटना चिंचवड येथे विठ्ठल मंदिराच्या बाजूला शनिवारी (दि.3) रात्री पावणे आठ वाजता घडली.

याप्रकरणी संबंधीत महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अक्षय परमेश्वर लवटे (वय 22, रा.चिखली) याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर, त्याचा साथीदार सुनिल मधुकर अर्जून (वय 25 रा. चिखली) हा पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी (Chikhali Theft Case) महिला व त्यांचे पती हे त्यांच्या एका मित्राच्या घरी सत्यनारायणाच्या पुजेसाठी पायी चालले होते. यावेळी त्यांच्या समोरून एक दुचाकी आली; ज्यावर दोघेजण बसले होते. त्यातील पाठीमागे बसलेल्या तरुणाने फिर्यादी यांच्या हातातील पर्स हिसकावली. यावेळी फिर्यादी यांनी ती दुसऱ्या हाताने घट्ट धरली. यावेळी आरोपीने त्याच्या हातात असलेल्या धारदार शस्त्राने फिर्यादीच्या हाताच्या मनगटावर मारले. फिर्यादी जखमी झाल्याने त्यांची पर्स हातून निसटली. पर्समध्ये 5 हजार रुपयांचा मोबाईल, 1 हजार रुपये रोख व 1 हजार रुपयांची पर्स असा एकूण 7 हजार रुपयांचा ऐवज हिसकावून आरोपी दुचाकीवरून पळून जाऊ लागले.

Dr. Nitin Lonari : चाकणच्या डॉ. लोणारी यांना ऑस्ट्रेलिया विद्यापीठातर्फे डिलीट पदवी प्रदान

यावेळी काही अंतरावर गेल्यानंतर दुचाकी थांबली व त्यातील पाठीमागे बसलेला चोरटा उतरून पळून जाऊ लागला. यावेळी फिर्यादी व त्यांच्या पतीने आरडा-ओरड केल्यानंतर तेथील नागरिकांनी पाठलाग करून चोरट्याला पकडले. नागरिकांच्या सतर्कतेमळे चोर रंगेहात पोलिसांच्या हाती लागला. चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

काही दिवसांपूर्वीच भोसरी येथे गर्दीचा गैरफायदा घेत लहान मुलीच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या महिलेला नागरिकांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या हवाली केले होते. त्यामुळे नागरिकांनी वेळीच सतर्कता व एकमेकांना सहाय्य केले, तर अशा चोऱ्यांवर नक्कीच आळा बसेल.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.