Hinjawadi: हिंजवडी पोलिसांचा हुक्का पार्लर वर छापा

एमपीसी न्यूज – भुगाव रोड, बावधन येथे एका हॉटेलमध्ये (Hinjawadi)सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर हिंजवडी पोलिसांनी कारवाई केली. हॉटेलचा मालक आणि व्यवस्थापक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 19) करण्यात आली.
व्यवस्थापक प्रवीण अमृतलाल गौतम (वय 19, रा. भूगाव, ता. मुळशी), (Hinjawadi)मालक समीर श्रीधर शेट्टी (वय 41, रा. वारजे, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत याप्रकरणी पोलीस अंमलदार रवी पवार यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Maratha reservation: मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन येथील टिप्सी टर्टल बार आणि रेस्टॉरंट मध्ये हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. आरोपींनी प्रतिबंधित तंबाखूजन्य हुक्का ग्राहकांना पिण्यासाठीउपलब्ध करून दिला. हिंजवडी पोलिसांनी छापा मारून 34 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. हॉटेलचा मालक आणि व्यवस्थापक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.