Hinjewadi News : पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ‘या’ भागात अवजड वाहनांना बंदी

एमपीसी न्यूज – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आहेत. त्यामुळे पंतप्रधान यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व उपाय योजना केली जात आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ननावरे अंडरपास ते सूस गाव सनीज वर्ल्ड रस्त्यावर अवजड वाहनांच्या प्रवेशासाठी रविवारी बंदी घातली आहे. 
पिंपरी चिंचवड शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ननावरे अंडरपास ते सूस गाव सनीज वर्ल्ड या रस्त्यावर जाणाऱ्या व येणाऱ्या अवजड वाहनांना (मिक्सर, कंटेनर) प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. रविवारी (दि.06) सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पुढील आदेशा पर्यंत अवजड वाहनांना प्रवेश बंदी आहे.

अत्यावश्यक सेवेतील फायर ब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका वाहनांखेरीज अन्य वाहनांसाठी तात्पुरत्या स्वरुपात आदेश काढण्यात आल्याची माहिती भोईटे यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.