Bhosari News: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याविरोधात काँग्रसचे आंदोलन

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले यांच्याविषयी केलेले निंदाजनक वक्तव्य आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप करत पिंपरी-चिंचवड काँग्रेसने आज (शनिवारी) भोसरी येथे त्यांच्याविरोधात आंदोलन करत निषेध केला.राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी. महाराष्ट्राच्या राज्यपालांना केंद्राने परत बोलवावे, अशी मागणीही आंदोलकांनी केली.

या निषेध आंदोलनात काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा  सायली नढे, भोसरी विधानसभा काँग्रेस अध्यक्ष दिनकर भालेकर, चिंचवड विधानसभा प्रमुख माऊली मलशेट्टी, पिंपरी विधानसभा अध्यक्ष विश्वनाथ जगताप, समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष रफीक कुरेशी, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रविण कदम, तसेच इस्माईल संगम, झेवियर अँथोनी आदींसह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होत. त्यांनी राज्यपाल कोश्यारी आणि केंद्रीय मंत्री दानवे यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

हरिष डोळस यावेळी निषेध करताना म्हणाले की, ”राज्यपाल कोश्यारी हे आरएसएसच्या प्रचारकाप्रमाणे वागतात. त्यांच्या डोक्यात संघाप्रमाणे मनूवादी विचार आहेत. ज्या रामदास स्वामींची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची कधीही गाठभेट झालीच नाही. तरीही समाजामध्ये अशांतता निर्माण होणारे भाषण राज्यपाल करतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या केंद्रीय मंत्री दानवे यांनी जाणिवपूर्वक एकेरी उल्लेख केला आहे. याची चित्रफित समाज माध्यमांमध्ये आहे. शिवाजी महाराजांचे फोटो वापरुन भाजपाने निवडणूकीत मते मागितली अशा मनुवादी भाजपचा पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेस जाहिर निषेध करीत आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.