Hinjawadi : लग्नास होकार देत नसल्याने तरुणीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज – लग्नाला होकार देत नसल्याने तरुणाने तरुणीला त्याच्या घरी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच तरुणीच्या गळ्याला चाकू लाऊन तिच्या (Hinjawadi) घरच्यांकडे पैशांची मागणी केली. हा प्रकार 22 ऑक्टोबर 2022 ते 2 एप्रिल 2023 या कालावधीत लक्ष्मी चौक, हिंजवडी येथे घडला.

तेजस किरण सौदाणकर (वय 24, रा. पिसोळी, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune : वर्षानुवर्षे दुभंगलेले चार संसार लोकन्यायालयात जुळले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीने तेजस याच्याशी लग्न करण्यास होकार दिला नाही, यावरून त्याने तरुणीला ती राहत असलेल्या पीजीवरून त्याच्या घरी जबरदस्तीने नेले.(Hinjawadi) तिथे तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. तरुणीला मारहाण, शिवीगाळ करून तिच्या गळ्याला चाकू लाऊन तरुणीच्या घरच्यांना पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच तेजस याने तरुणीला त्याच्या घरात डांबून ठेवले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.