New Honda Activa: होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियातर्फे नवी 2022 अ‍ॅक्टिव्हा प्रीमियम एडिशन लाँच

एमपीसी न्यूज : गेल्या दोन दशकांपासून विश्वासार्हता आणि स्टाइलच्या जोरावर लाखो भारतीयांना आनंद देणाऱ्या होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियातर्फे होंडा (New Honda Activa) अ‍ॅक्टिव्हाची नवी 2022 अ‍ॅक्टिव्हा प्रीमियम एडिशन लाँच करण्यात आली आहे.

याप्रसंगी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया चे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अत्सुशी ओगाता म्हणाले, ‘कायमच आघाडीवर राहिलेल्या होंडा अ‍ॅक्टिव्हाने आपल्या सर्वसमावेशक स्टाइलने देशातील सर्व वयोगटातल्या रायडर्सना आकर्षित केले आहे. (New Honda Activa) गेल्या दोन दशकांपासून ब्रँड अ‍ॅक्टिव्हा तंत्रज्ञानाच्या बाबतीत अधिकाधिक प्रगत होत गेली असून तिचे डिझाइनही प्रत्येक अपडेटनंतर अधिक आकर्षक झाले आहे. 2022 प्रीमियम एडिशनसह अ‍ॅक्टिव्हाचं नवं रूप सादर करतान आम्हाला आनंद होत असून ही गाडी ग्राहकांना आवडेल असा विश्वास वाटतो. ’

Shirgaon News: शिरगांव येथे विद्युत शॉक लागून शेतात शेतकऱ्याचा मृत्यू

नव्या वैशिष्ट्यांसह प्रीमियम डिझाइन

नव्या 2022 अ‍ॅक्टिव्हा प्रीमियम एडिशनचं आलिशान रूप लगेच लक्ष वेधून घेणारे आहे. गाडीच्या मागे असलेल्या ग्रॅब रेल्सपर्यंत सगळेच रूप दमदार व आलिशान आहे.

नव्या युगातील रायडर्सना आकर्षित करणाऱ्या नव्या एडिशनमध्ये पुढच्या बाजूला गोल्डन होंडा मार्क देण्यात आला असून थ्रीडी गोल्डन ‘अ‍ॅक्टिव्हा एम्बलेम आणि बाजूला असलेले प्रीमियम एडिशन स्ट्राइप्स देण्यात आले आहेत.(Honda Activa) यामुळे गाडीचे रूप फक्त समोरूनच नव्हेतर बाजूनेही आकर्षक झाले आहे.

आतील कव्हर्सवरील कॅफे ब्राउनाच्या छटा आणि सॅडल ब्राउन सीट्समुळे या एडिशनचे एकंदर रूप अभिरूचीपूर्ण दिसते. स्टाइल उंचावण्यासाठी गाडीला सोनेरी रंगाची चाकं लावण्यात आली आहेत (New Honda Activa) आणि नव्या एडिशनमध्ये ब्लॅक्ड आउट- फ्रंट सस्पेन्शन व इंजिन कव्हरसह वेगळा लूक देण्यात आला आहे.

 

किंमत आणि उपलब्धता

अ‍ॅक्टिव्हा प्रीमियम एडिशन मॅट सांगरिया रेड मेटॅलिकमॅट मार्शल ग्रीन मेटॅलिक आणि पर्ल सायरन ब्लू अशा तीन आकर्षक रंगांत उपलब्ध आहे.(New Honda Activa) नवी अ‍ॅक्टिव्हा प्रीमियम एडिशन केवळ डिलक्स व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असून तिची किंमत 75,400 रुपये (एक्स शोरूमदिल्ली) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.