Pune : आझम कॅम्पस मध्ये शनिवारी इफ्तार पार्टी

एमपीसी न्यूज – डॉ. पी. ए. इनामदार युनिव्हर्सिटी, (Pune) महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी, हाजी गुलाम महम्मद आझम एज्युकेशन ट्रस्ट, ‘अवामी महाज ‘ सामाजिक संघटना आणि आझम कॅम्पस परिवारातील संलग्न संस्थांच्या वतीने शनिवारी (दि. 15) इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे.  संस्थेचे प्रमुख आणि कुलपती डॉ. पी. ए. इनामदार यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

पुण्याचे सह पोलीस उपायुक्त संदीप कर्णिक यांची या इफ्तार पार्टीसाठी प्रमुख उपस्थिती असणार आहे. आझम कॅम्पस मधील फंक्शन ग्राउंडवर सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. रमजान महिन्यातील उपवास (रोजा) सोडण्यासाठी खास व्यवस्था करण्यात येणार आहे. मुस्लिम बांधवांना रमजान महिन्याच्या शुभेच्छा देण्यासाठी सर्व धर्मीय, सर्वपक्षीय मान्यवर तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचे इनामदार यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Pune : एमएचटी सीईटी परीक्षेसाठी सहा लाख 19 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी

आझम कॅम्पस येथे नियमितपणे इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते. सर्वधर्मियांना सोबत घेऊन एकोपा जपण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. (Pune) मुस्लीम बांधवांचा रमजान हा पवित्र महिना असून त्यानिमित्त महिनाभर मुस्लीम बांधव उपवास ठेवतात. दिवसाच्या शेवटी उपवास सोडताना सामाजिक सलोखा वाढविण्याच्या दृष्टीने असे उपक्रम राबविले जातात.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.