India Corona Update : मागील 24 तासांत 47,704 नव्या रुग्णांसह 654 मृतांची नोंद, एकूण मृतांची संख्या 33,425 वर

India Corona Update: In the last 24 hours, 654 deaths and 47,704 new patients, total death toll to 33,425 गेल्या 24 तासांत देशभरातून जवळपास 35,175 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. यासह देशातील रुग्णांपर्यंत होण्याचे प्रमाण 64.23 टक्के एवढे झाले आहे.

एमपीसी न्यूज – देशात कोरोना विषाणूचा कहर सुरुच आहे. दिवसेंदिवस मोठ्याप्रमाणात वाढणारी कोरोना बाधितांची संख्या चिंताजनक आहे. मागील 24 तासांत 47,704 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 654 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या वाढीमुळे देशातील कोरोना बाधितांचा आकडा 14,83,157 वर पोहचला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 4,96,988 सक्रिय रुग्ण असून 9,52,744 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 654 रुग्णांचा मृत्यू झाला असून देशात एकूण 33,425 रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली आहे.

देशात आत्तापर्यंत 1,73,34,885 नमुने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 5,28,082 चाचण्या सोमवारी (दि.28) करण्यात आल्या आहेत. आयसीएमआरने याबाबत माहिती जाहीर केली आहे.

देशातील रुग्णांची संख्या वाढत असली तरी, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. गेल्या 24 तासांत देशभरातून जवळपास 35,175 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. यासह देशातील रुग्णांपर्यंत होण्याचे प्रमाण 64.23 टक्के एवढे झाले आहे.

देशात कोरोना संसर्गाचे संकट कायम असले तरी त्यावर मात करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोना विषाणूच्या चाचण्या करण्यासाठी देशात मुंबई, कोलकाता आणि नोएडा येथे हायटेक लॅब्स उभारण्यात आल्या आहेत. सोमवारीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या लॅब्सचे उद्घाटन करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.