Pimpri News : स्वच्छतेचा ‘इंदूर पॅटर्न’! मानधनावर 168 कर्मचाऱ्यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – पिंपरी- चिंचवड शहरामध्ये स्वच्छतेचा ‘इंदूर पॅटर्न’ राबविण्यात येत आहे. त्यासाठी विविध 11 पदांवर 168 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यांच्या मानधनावर दोन कोटी 78 लाख रुपयांचा खर्च होणार आहे.

महापालिका आयुक्त  राजेश पाटील यांनी शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी ‘इंदूर पॅटर्न’ राबविण्याचा संकल्प केला आहे. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत घराघरातून ओला आणि सुका कचरा वेगवेगळा घेण्यात येत असून, शहरातील कचराकुंड्या हटविण्यात येत आहेत.

अनधिकृत होर्डिंग्ज, फ्लेक्स आणि किऑक्सवर धडक कारवाई मोहीम वेगात सुरू होणार आहे. तसेच मोकाट आणि भटकी कुत्री, जनावरे आणि डुकरांवर नियंत्रण आणण्यासाठी नियोजन करण्यासाठी हे कर्मचारी काम करणार आहेत.

या मोहिमेसाठी मनुष्यबळाची कमतरता पडू नये, यासाठी या कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येत आहे. त्यासाठी चार पशुवैद्यकीय अधिकारी, 32 कनिष्ठ अभियंता, 20 सुपरवायझर, चार परवाना निरीक्षक, 16 निरीक्षक, 16 आरोग्य सहायक, चार लाइव्हस्टॉक सुपरवायझर, चार ॲनिमलकीपर आणि 52 माळी यांची निवड करण्यात आली आहे. ही भरती सहा महिन्यांसाठी असणार आहे. त्यासाठी 22 हजार 820 ते 40 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.