Pune : जगभरातील इंटरनेट सेवा 48 तास ठप्प होण्याची शक्यता

मुख्य डोमेन सर्व्हरचे काम सुरु

एमपीसी न्यूज – येत्या 48 तासात जगभरातील इंटरनेट सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे. इंटरनेटच्या मुख्य डोमेन सर्व्हरचे काम करण्यात येणार असल्याने इंटरनेट सेवा वापराबाबत अडचणी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

इंटरनेट सेवेच्या कामामुळे मुख्य डोमेन सर्व्हर आणि त्याच्याशी संबंधित नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर काही काळासाठी डाऊन होण्याची शक्यता आहे. मुख्य डोमेन सर्व्हरचे नियमित देखरेखीचे काम काही तासांसाठी सुरु करण्यात येणार असून, त्यामुळे इंटरनेट सेवेवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
‘इंटरनेट कॉर्पोरेशन ऑफ असाइन्ड नेम्स अँड नंबर्स’ यादरम्यान इंटरनेट संदर्भातील क्रिप्टोग्राफिक की बदलून याच्या मेंटन्सचे काम केले जाणार आहे. त्यामुळे इंटरनेटचे अड्रेस बुक आणि डोमेन नेम सिस्टिम संरक्षित करण्यास मदत होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.