IPL 2023 : मुंबई इंडियन्सचा अखेर पहिला विजय

एमपीसी न्यूज – मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स मध्ये झालेल्या सामन्यामध्ये मुंबईने दिल्ली ला हरवून स्वतःचा आयपीएल 2023 मधला पहिला सामना जिंकला. (IPL 2023) दिल्ली ने स्वतःचे चार पैकी चारही सामने हरले आहेत. त्यांचा संघात ऋषभ पंतची कमतरता जाणवत आहे. अरुण जेटली स्टेडियम मध्ये झालेल्या या सामन्यामध्ये मुंबई ने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 

फलंदाजी करताना सलामीवीर पृथ्वी शॉ (15) काही जास्त प्रभाव करू शकला नाही आणि लवकरच बाद झाला. त्याचा जोडीदार डेव्हिड वॉर्नर ने हळू पण स्थिर कामगिरी करत 47 चेंडूमध्ये 51 धावा काढल्या. मनीष पांडे ने पण चांगला कॅमियो दाखवत 26 धावा काढल्या. रोवमन पॉवेल(4), यश धुल्ल (2) आणि ललित यादव (2) स्वस्तातच बाद झाले. अक्षर पटेलच्या 25 चेंडूमध्ये 54 धावांच्या मजबूत खेळी मुळे दिल्ली 172 च्या सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचली. मुंबईकडून गोलंदाजी करताना जेसन बेहरेनडॉर्फ आणि पियुष चावला यांनी तीन बळी घेतले. रिले मेरेडिथ ने 2 बळी तर ह्रतिक शौकीन ने 1 बळी घेतला.

Pimpri : पिंपरीत क्रिकेट बेटिंगवर गुन्हे शाखेचा छापा

173 धावांचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात अतिशय उत्तम झाली. कर्णधार रोहित शर्मा (65) आणि युवा खेळाडू ईशान किशन (31) यांनी मुंबईला सुरेख सर्वात देवून 173 भावांच्या लक्षाचा पाठलाग करताना चांगला पाया रचला. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या ते तिलक वर्मा ने 29 चेंडूमध्ये 41 धावा काढल्या.(IPL 2023)  या तिघांमुळे मुंबई इंडियन्स ने सहा गडी राखून हा सामना अंतिम चेंडूवर जिंकला. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेल्या मुकेश कुमारने दोन बळी घेतले तर मुस्ताफिझुर रेहमान ने एक बळी घेतला. रोमांचक सामन्यामध्ये मुंबईने आयपीएल 2023 चा पहिला सामना जिंकला.

मुंबईने जरी स्वतःचा पहिला सामना जिंकला असला तरी सूर्यकुमार यादव चा खराब फॉर्म हा संघासाठी चिंताजनक आहे. रोहित शर्मा ने मागच्या सामन्यामध्ये चांगली खेळी केल्याने समर्थकांच्या जीवात जीव आला आहे असे म्हणू शकतो. दिल्ली कॅपिटल्स अजूनही एकही सामना जिंकू शकलेली नाही. कर्णधार डेव्हिड वॉर्नरला ऋषभ पंत ची अनुपस्थिती मोठी डोकेदुखी ठरत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.