Pune BRT Route : बीआरटी मार्गातून वाहन दामटणे ‘त्या’ 638 जणांना पडले महागात

एमपीसी न्यूज – बीआरटी मार्ग (BRT Route)  हे पीएमपीएमएल बससाठी तसेच अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी आहेत. मात्र अनेक खाजगी वाहन चालक त्या मार्गातून वाहने दामटतात, अशा वाहनांवर वाहतूक पोलिसांनी रविवारी (दि. 5) कारवाई केली. आठ वाहतूक विभागात 638 वाहनांवर कारवाई करत 3 लाख 12 हजारांचा दंड आकारण्यात आला आहे.

शहरातील बीआरटी मार्गातून (BRT Route)  काही बेशिस्त वाहनचालक त्यांची वाहने चालवतात. ही वाहने अचानक बंद पडतात, अपघात होतात यामुळे पीएमपीएमएल बसला अडथळा निर्माण होतो. बीआरटी मार्गात इतर वाहनांची घुसखोरी झाल्याने अपघात झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. बीआरटी मार्गावर जागोजागी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यालाही न जुमानता हे बहाद्दर आपली वाहने दामटतात.

Hinjawadi News : समाजातील तरुणांनी ‘युपीएससी टॉपर’साठी प्रयत्न करावेत – संग्राम पाटील

यावर आळा घालण्यासाठी पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी रविवारी विशेष मोहीम राबवली. यात काही एसटी बस तसेच टेम्पो व इतर अवजड वाहने देखील बीआरटी मार्गात घुसल्याचे समोर आले. अशा वाहनांवर देखील पोलिसांनी कारवाई केली.

वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे म्हणाले, “बीआरटी मार्गातून (BRT Route)  वाहन चालवू नये. अन्यथा अशा बेशिस्त चालकांवर यापुढेही कारवाई सुरूच राहील. वाहतूक सुरळीत होऊन अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वच वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.”

वाहतूक पोलिसांनी बीआरटी मार्गातील वाहनांवर केलेली कारवाई –

वाहतूक विभाग – केसेस – दंड (रुपयांमध्ये)

  • सांगवी – 199 – 1, 25 000
  • वाकड – 100 – 64, 000
  • पिंपरी – 112 – 60, 000
  • निगडी – 70 – 37, 000
  • चिंचवड – 68 – 35, 000
  • भोसरी – 63 – 31, 500
  • देहूरोड – 16 – 80, 000
  • दिघी आळंदी – 10 – 5, 000

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.