Johnson & Johnson : एकच डोस पुरेसा असणारी जॉन्सन अँड जॉन्सन ची लस जुलैमध्ये बाजारात!

एमपीसी न्यूज : देशात आता करोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच करोनाचा अतिघातक डेल्टा प्लस विषाणू देशात आढळून आला आहे. त्यामुळे करोना लसीकरण वेगाने करण्यात येत आहे. यातच आता भारताला करोनाची आणखी एक लस मिळणार आहे.

जुलैमध्ये अर्थात पुढील महिन्यात जॉन्सन अँड जॉन्सनच्या करोना प्रतिबंधक लसीला भारतात परवानगी मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे जॉन्सन अँड जॉन्सनच्या करोना लसीचा केवळ सिंगल डोस घ्यावा लागणार आहे. सुरुवातीला या लसीचे केवळ 1 हजार डोस उपलब्ध होणार आहेत.  ही लस सुमारे 1850 रुपयापर्यंत उपलब्ध होऊ शकेल.

देशात जॉन्सन अँड जॉन्सनच्या लशीची खऱेदी खासगी क्षेत्राच्या माध्यमातून कऱण्यात येणार आहे. खासगी क्षेत्र अत्यंत कमी प्रमाणात या लसीचे डोस खरेदी करू शकणार आहेत. तर लस खरेदीसंदर्भात सरकारकडून अद्याप काहीही स्पष्ट कऱण्यात आलेलं नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.