Khed : खुन्नसने बघितल्याच्या कारणावरून झाला ‘त्या’ तरुणाचा खून

एमपीसी न्यूज – हिंजवडी फेज एक येथून बेपत्ता झालेल्या (Khed) तरुणाचा खून करून मृतदेह पुणे-नाशिक महामार्गावर खेड तालुक्यातील सांडभोरवाडी येथे फेकला. या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने एकास अटक केली.

मयूर संदीप दळवी (रा. कोपरगाव, जि. अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सौरभ नंदलाल पाटील (वय 23, रा. शिर्डी, ता. राहता, जि. अहमदनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

सौरभ हा हिंजवडी फेज एक येथील एका आयटी कंपनीत नोकरी करीत होता. 28 जुलै रोजी तो दुचाकीवरून कंपनीत कामासाठी गेला. त्यानंतर तो परत आलाच नाही.

दरम्यान, त्याच्या कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध केली. मात्र त्याचा थांगपत्ता लागत नसल्याने त्याच्या नातेवाईकांनी हिंजवडी पोलीस (Khed) ठाण्यात सौरभ बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.

5 ऑगस्ट रोजी खेड तालुक्यातील सांडभोरवाडी येथे वन विभागाच्या जागेत पुणे-नाशिक महामार्गालगत डोंगर उताराला सौरभ याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला.

PCMC : सकस आहारासाठी महापालिका मोजणार सव्वा दोन कोटी

त्यामुळे त्याचा खून करून मृतदेह फेकून दिल्याची शक्यता लक्षात घेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सूत्र फिरवत मयूर दळवी याला अटक केली.

मयूर दळवी आणि सौरभ पाटील हे कोपरगाव येथे शिक्षणासाठी एकत्र होते. त्यावेळी खुन्नसने बघण्याच्या कारणावरून मयूरच्या मनात सौरभ बद्दल राग होता.

त्यातूनच त्याने चाकूने वार करत तसेच दगडाने ठेचून सौरभ याचा खून केल्याचे तपासात समोर आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.