Khed : पीकअपची पायी जाणाऱ्या पती-पत्नीला धडक, पत्नीचा मृत्यू

एमपीसी न्यूज – वेगात आलेल्या पीकअपने पायी (Khed) जाणाऱ्या पती-पत्नीला पाठीमागून जोरात धडक दिली. यात पत्नीचा मृत्यू झाला आहे. हा अपघात बुधवारी (दि.29) मोईगाव, खेड येथे घडला आहे.

याप्रकरणी राहूल प्रतापसिंग कुशावाह (वय 29, रा.कुरुळी,खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात पीकअप चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : दहा हजार लोकांनी गीता – पठण करण्याचे मंडळाचे ध्येय – डॉ. मुकुंद दातार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांच्या पत्नी या मोईगाव येथे पायी जात होते. यावेळी आरोपीने त्याच्या ताब्यातील (Khed) पीकअप वेगाने चालवून फिर्यादी व त्यांच्या पत्नीला जोरात धडक दिली.

या धडकेत फिर्यादी यांची पत्नी गंभीर जखमी झाली व यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. यावरून पीकअप चालकावर गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.