Pune : दहा हजार लोकांनी गीता – पठण करण्याचे मंडळाचे ध्येय – डॉ. मुकुंद दातार

एमपीसी न्यूज – सदाशिव पेठ येथील (Pune) गीताधर्म मंडळ या शताब्दी संपन्न सांस्कृतिक संस्थेने भगवद्गीता प्रसाराचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण गीतापाठ पठनाचा लक्षवेधी कार्यक्रम आयोजित केला आहे. यासाठी एकाच ठिकाणी बसून 10 हजार लोकांनी गीता – पठण करण्याचे मंडळाचे ध्येय आहे.

दिनांक 3 डिसेंबर रविवारी दुपारी 2 ते 6 या वेळात स. प. महाविद्यालयाच्य विस्तृत क्रीडांगणावर हा कार्यक्रम होणार आहे. 90 टक्के नावनोंदणी आतापर्यंत झाली असून, त्यांना प्रक्षेशिकांचे वितरणही झाले आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. मुकुंद दातार यांनी आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

PCMC : मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धेसाठी तयारी करा; अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश

यावेळी कार्यवाह विनया मेहेंदळे, सहकार्यवाह प्राचार्य मुकुंद कोंढवेकर, संयोजक शताब्दी महोत्सव ह. भ. प. मोरेश्वरबुवा (Pune) जोशी, डॉ. शैलजा कात्रे, अस्मिता घाटे, ऍड. आनंद आकुत, हेमंत लेले उपस्थित होते.

हा उपक्रम ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नोंदविला जावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचीही तयारी उत्तमरित्या सुरू आहे. भगवद्गीता हा भारतीय संस्कृतीचा प्राणमंत्र आहे. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, आचार्य विनोबा, स्वामी विवेकानंद आणि योगी अरविंद इत्यादीकांनी  भगवद्गीतेचा मुक्तकंठाने गौरव केला आहे.

तीला ‘सांस्कृतिक भारतवर्षाची तत्वगाथा’ म्हटले आहे. लोकमान्यांनी तर ‘गीतारहस्य’ लिहून आपणाला निष्काम कर्मयोगाचा, राष्ट्रप्रेमी गीताधर्म शिकविला आहे. त्याच गीताधर्माच्या प्रचार – प्रसारासाठी गीताधर्म मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या 5 पिढया कार्यरत आहेत. त्यासाठी आजपर्यंत अनेक उपक्रम आयोजित झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.