Pune Crime : कोंढवा येथे घरफोडीत हिऱ्यांच्या दागिन्यांसह पावणे पंचवीस लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज कोंढवा येथील महोम्मदवाडी येथे घरफोडीत तब्बल 24 लाख 77 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. ज्यामध्ये सोन्या-चांदिचे (Pune Crime) व हिऱ्याच्या दागिन्यांचाही समावेश आहे. ही चोरी शनिवारी (दि.24) रात्री नऊ ते मध्य रात्री पावणे एक म्हणजे चार तासाच्या कालावधीत घडली आहे.

याप्रकऱणी 47 वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune News : ‘आयसीएआय’तर्फे ‘अग्निपंख’ दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे राहते घर कुलुप लावून बंद असताना चोरट्याने घराच्या पहिल्या माळ्यावरील खिडकीचे दोन रॉड तोडून व वाकवून (Pune Crime) खिडकीद्वारे घरात प्रवेश केला. बेडरुम मध्ये जाऊन घरातील लोखंडी तिजोरी तोडून त्यातील 12 हजार रुपये रोख व सोन्याचे व हिऱ्याचे दागिने असा एकूण 24 लाख 77 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला असून पोलीस कसून चोरट्यांचा तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.