रविवार, सप्टेंबर 25, 2022

Maval News : कोथुर्णे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी प्रयत्न करणार – देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ विश्व हिंदु परिषद, बजरंग दल मावळ व नागरिकांच्या वतीने पवनानगर बाजारपेठेत रविवारी (दि.7) उपोषण करण्यात आले. बजरंग दलाच्या शिष्ट मंडळाने माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या समवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. शिष्ट मंडळाने घटनेची सविस्तर माहित देऊन फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.

याच उपोषणाची दखल घेत भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ व माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी उपोषणस्थळी भेट दिली असता. मुख्यमंत्री व उमुख्यमंत्री यांची भेट घालून देऊ, असे आश्वासन दिल्यानंतर बेमुदत उपोषण सोडण्यात आले होते. त्याच आश्वासनाची पूर्ती करण्यासाठी बजरंग दलाचे शिष्टमंडळ माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या समवेत बुधवार (दि.10)  भेट घेऊन घटनेची सविस्तर माहित देण्यात आली व निवेदन देण्यात आले.

यावेळी उपुख्यमंत्री म्हणाले की, मावळच्या लेकीला लवकरात लवकर न्याय मिळवुन देण्यात येईल. मी या प्रकरणात स्वतः लक्ष घालणार असून या प्रकरणासाठी चांगल्यात चांगला वकील देणार असून ही केस फास्ट ट्रॅक पद्धतीने चालवणार आहे. या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा कशी होईल यासाठी प्रयत्न करणार आहे. पीडित कुटुंबाला शासनाच्यावतीने जी काही मदत करता येईल ती करण्यात येईल तसेच माननीय मुख्यमंत्री यांच्या  माध्यमातून 5 लाखाची मदत करण्यात येईल.

या वेळी बोलताना माजी राज्यमंत्री बाळा भेगडे म्हणाले की, स्वराला न्याय मिळेपर्यंत हा लढा शेवट पर्यंत सुरू ठेवणार आहे. व शासनाच्या वतीने या कुटुंबाला जी काही मदत करता येईल ती करण्याचा मी प्रयत्न करणार आहे.

नराधमाला फाशीची शिक्षा होऊन पीडितेला न्याय मिळे पर्यंत बजरंग दल पाठपुरवठा करत राहणार आहे अशी माहिती विभाग संयोजक संदेश भेगडे यांनी दिली.

यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, विभाग मंत्री संदेश भेगडे, भा ज पा संघटन मंत्री गणेश ठाकर, मुलीचे वडील जनार्दन चांदेकर, गणेश सावंत, सह संयोजक बजरंग दल बाळा खांडभोर, प्रशांत ठाकर, निलेश ठाकर, सुनिल ढोरे, अक्षय येळवंडे, विश्वास दळवी, निलेश खेंगरे, महेश सोनार उपस्थित होते

spot_img
Latest news
Related news