सोमवार, सप्टेंबर 26, 2022

Pimpri Corona Update : शहरात आज 88 नवीन रुग्णांची नोंद; 86 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड  शहराच्या विविध भागातील 88 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (गुरूवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 86 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 627 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 68 हजार 734 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 630 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 604 रुग्ण  गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

तर, 26 रुग्ण महापालिका  रुग्णालयामध्ये दाखल आहे. आज दिवसभरात 604 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 37 लाख 26 हजार 613 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

 

spot_img
Latest news
Related news