Pune News : आमदार चषक फुटबॉल सपर्धेत केपी इलेव्हन, इंद्रायणी एससी उपांत्यपूर्व फेरीत दाखल

एमपीसी न्यूज : केपी इलेव्हन, इंद्रायणी एससी, (Pune News) दुर्गा एसए संघांनी आपली विजयी कामगिरी कायम राखताना येथे सुरु असलेल्या एमएलए करंडक 2023 फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. 

पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या माध्यमातून माया सेवा संस्थेने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. सामने शासकीय पॉलिटेक्निकच्या मैदानावर सुरु आहेत.

रेंजहिल्स यंग बॉईज, लौकिक एफ.ए.संघांना पुढे चाल मिळाल्यामुळे त्यांनाही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला.

Chinchwad News : रिद्म्स ऑफ आर डी बर्मन या कार्यक्रमात पंचमदा यांच्या गाण्याने रसिक मंत्रमुग्ध

पहिल्या सामन्यात केपी इलेव्हन संघाने इन्फंट्स एलिट एफसी संघाचा 1-0 असा पराभव केला. एकमात्र विजयी गोल प्रसाद पाधाने 13 व्या मिनिटाला केला. अन्य दोन सामन्यात दुर्गा एस.ए. आणि इंद्रायणी एस.सी संघांनी 3-0 असा विजय मिळविला.

दुर्गा संघाने नयनेश दुर्गा, अभिषेक पाल, प्रबोध भोसलेने केलेल्या तीन गोलच्या जोरावर ग्रीनबॉक्स चेतक संघाचा पराभव केला.इंद्रायणी संघाने नव महाराष्ट्राचा पराभव केला. मकरंद हरदेव, सुरज बहिरट आणि शुभम गायकवाड यांनी गोल केले.

 

निकाल –

दुर्गा एस ए. 3 (नयनेश दुर्गा 13 वे मिनिट, अभिषेक पाल 55वे मिनिट, प्रबोध भोसले 61 वे मिनिट) वि.वि. ग्रीनबॉक्स चेतक एफसी 0

केपी इलेव्हन 1 (प्रसाद पाढा 13 वे मिनिट) वि.वि. इन्फंट एफसी 0

इंद्रायणी एस.सी. 3 (मकरंद हरदेव 26 वे मिनिट, सुरज बहिरट 36 वे मिनिट, शुभम गायकवाड 48 वे मिनिट) वि.वि. नव महाराष्ट्र 0

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.