Kundmala Incident : कुंडमाळा येथे इंद्रायणीत तरुण वाहून गेला 

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील कुंडमाळा येथे (Kundmala Incident) इंद्रायणी नदीत आज दुपारी चारच्या सुमारास एक तरुण वाहून गेला.

या तरुणाचे नाव वैभव देसाई (वय 22) असून तो आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ खवय्या हॉटेल येथे राहतो. तो मूळचा गोव्याचा आहे, असे वन्यजीव रक्षक मावळचे संस्थापक अध्यक्ष नीलेश गराडे यांनी सांगितले.

Pavana Dam : पावसाची जोरदार बॅटिंग! धरण 96 टक्क्यांवर, धरणातून विसर्गाची शक्यता

देसाई हा त्याच्या 3 ते 4 मित्रांबरोबर कुंडमळा येथे (Kundmala Incident) वर्षाविहारासाठी आला  होता. कुंडमळा हे पर्यटनस्थळ देहूरोड व तळेगाव दाभाडे या दोन शहरापासून जवळ आहे. पुराच्या पाण्यात खेळत असताना वैभवचा पाय घसरल्याने तो इंद्रायणी नदीत पडून पाण्याच्या तीव्र वेगामुळे वाहून गेला.

नीलेश गराडे, गणेश ढोरे, दीपक नळे, प्रशांत शेडे, भास्कर माळी, सत्यम सावंत व इतर वन्यजीव रक्षक मावळचे सदस्य घटनास्थळी पोहोचले होते. तसेच तळेगाव दाभाडे व तळेगाव दाभाडे एमआयडीसी पोलीस ठाण्यांचे पोलीस अधिकारी व कर्मचारी देखील कुंडमळा येथे पोहोचले होते. पण इंद्रायणी नदीतील पाण्याचा खूप वेग असल्याने त्यांना वैभव देसाई याचा शोध घेता आला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.