Pune News : 100 कोटीचे कर्ज असलेली जागा 9 कोटीत विकली, जोशी कुटुंबावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : शंभर कोटी रुपयांचे कर्ज असलेली जागा अन्य एका व्यक्तीला नऊ कोटी रुपयांना विकून फसवणूक केल्याचा प्रन कार उघडकीस आला आहे. पुण्यातील वडगाव बुद्रुक भागात हा प्रकार घडला. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी अनिरुद्ध बाळकृष्ण जोशी, पत्नी व मुलगा आदित्य जोशी (रा. मुंबई) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 43 वर्षीय व्यक्तीने पुण्यातील सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी व्यवसायिक आहेत. जोशी कुटुंबाची वडगाव बुद्रुक भागात जागा आहे. त्यांची एक कंपनी आहे. या कंपनीने या जागेवर वेळोवेळी बँकांकडून जवळपास 100 कोटींचे कर्ज काढलेले आहे. मात्र ही माहिती लपवत जोशी कुटुंबाने फिर्यादी यांना 9 कोटी रुपयांना ही जागा विक्रीकरून फसवणूक केली आहे. याबाबत तक्रार अर्ज केला होता. त्याची शहानिशा करत चौकशी केली. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.