Talegaon Dabhade News : जुन्या अथर्व हॉस्पिटलमध्ये मोफत रुग्ण सेवेस प्रारंभ

एमपीसी न्यूज – गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अथर्व मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल तळेगाव दाभाडे यांच्या विद्यमाने मोफत जनरल दवाखान्याचे उद्घाटन आमदार सुनिल शेळके आणि ज्येष्ठ कृषी तज्ञ डॉ. सुरेश धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आले. समाजातील गरजू लोकांना या दवाखान्याचा निश्चितच लाभ होईल असे प्रतिपादन आमदार सुनिल अण्णा शेळके यांनी केले.              

या ठिकाणी मोफत जनरल तपासणी, इंजेक्शन व गोळ्या औषधे मोफत देण्यात येतील. ही सेवा कायमची कार्यरत राहील. समाजातील गरजू लोकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन अजित माने व डॉ. राजेंद्र देशमुख यांनी केले.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी माजी राज्यमंत्री  बाळा भेगडे, माजी उपनगराध्यक्ष यादवेंद्र खळदे, माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, माजी नगरसेवक  चंद्रभान खळदे, पोलीस कमिशनर गुन्हे अन्वेषण पुणे संभाजी कदम,माजी पोलीस उपायुक्त राम जाधव आदी मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.