Lonavala News : लोणावळ्यात मोठी कारवाई; 342 पोती गुटखा व चारचाकी वाहन असा 25 लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज : लोणावळा उप विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक आयपीएस सत्यसाई कार्तिक व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांच्या पथकाने लोणावळ्याजवळील (Lonavala News) कुसगाव गावात आज धडाकेबाज कारवाई करत तब्बल 25 लाख 67 हजार 40 रुपयांचा गुटखा (342 पोती) व वाहन असा मुद्देमाल जप्त केला.

लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना तसेच अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीमध्ये मौजे कुसगाव गावाच्या हद्दीमध्ये पुणे ते मुंबई एक्स्प्रेस हायवे रोडवर पुणे ते मुंबई बाजुकडे जाणारे लेनवर आय.आर.बी. कार्यालयाचे समोरील बाजूस हायवेवर कि.मी.नं. 57/600 जवळ सापळा लावण्यात आला. कर्नाटक राज्यामधून पुणे बाजूकडून मुंबईकडे जाणारा ट्रक नं. KA 32 AA 1138 ला दोन टिम करुन पकडून पहाणी केली असता यामध्ये कि. रु. 10,67, 040/- रुपयांची गुटख्याच्या पुड्यांची भरलेली 342 पोती . कि. रु. 15 लाख रुपयांचा ट्रक नं. KA 32 AA 1138 असा एकुण 25,67,040/- रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

Pune News : खडकी, शिवाजीनगर, हडपसर रेल्वे स्थानकांवरून पर्यायी रेल्वे सेवा सुरु करणार : गिरीश बापट

या प्रकरणी ट्रक चालक मोहम्मद खलील जमाल अहंमद शेख (वय 40 वर्षे) ट्रक क्लिनर नसरुद्दीन बुरानसाहब खडखडे (वय 35 वर्षे) व ट्रक मालक सदाम उर्फ सय्यद गुडुसाहब मुल्ला दस्तगीर यांच्या विरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहिता अधिनियमासह अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण एलसीबीचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहा पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, (Lonavala News) सहा. पोलीस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे, सहा पोलीस उपनिरीक्षक युवराज बनसोडे, पो. हवा. अंकुश नायकुडे, पो. हवा. स्वप्नील अहिवळे, पो.हवा चंद्रकांत जाधव, पोलीस हवा मंगेश थिगळे, पोलीस नाईक अमोल शेंडगे, पोलीस काॅन्स्टेबल सुभाष शिंदे, चालक अंकुश पवार, चालक अक्षय सुपे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.