Pune News : लम्पी त्वचा रोगासंदर्भात बाधित व निगराणी क्षेत्र जुन्नर, शिरूर व खेड तालुक्यातील गावात घोषित

एमपीसी न्यूज – जिल्ह्यात दौंड तालुक्यातील बोरीऐंदी व भरतगांव, जुन्नर तालुक्यातील मौजे मांजरेवाडी (खोडद), शिरुर तालुक्यातील मौजे गोलेगाव आणि खेड तालुक्यातील मौजे करंजविहिरे या गावांमध्ये जनावरांना लम्पी त्वचा रोगाचा संसर्ग झाला असल्याने प्राण्यांच्या संसर्ग केंद्रापासून 10 किलोमीटर बाधित क्षेत्र व निगराणी क्षेत्र म्हणून घोषित करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहे.

प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम 2009 नियम 12 नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन वरील पाचही गावापासून 10 किलोमीटर परिघातील क्षेत्रामध्ये बाधित व निगराणी क्षेत्रामधील जनावरांची खरेदी- विक्री, वाहतूक, बाजार, जत्रा व प्रदर्शन, बैलांच्या शर्यती आयोजित करण्यास पुढील आदेश येईपर्यंत प्रतिबंध घालण्यात आली आहे. बाधित व अबाधित पशुधनास आवश्यकतेनुसार प्रतिबंधात्मक लसीकरण करणे बंधनकारक करण्यात आले असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.