Maharashtra Corona Update : राज्यात 7,854 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण, आज 539 नव्या रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – राज्यात आज (सोमवारी) 539 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून 853 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्येत लक्षणीय घट झाली असून सध्या 7 हजार 854 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 66 लाख 34 हजार 980 एवढी झाली आहे. त्यापैकी 64 लाख 82 हजार 493 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.70 टक्के एवढा आहे.

 

राज्यात आज 21 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजवर 1 लाख 40 हजार 962 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे.

राज्यात 85 हजार 800 रुग्ण होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1,028 रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 54 लाख 20 हजार 117 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.