Maharashtra Corona Update : कोरोना जातोय ! राज्यातील ॲक्टिव्ह रूग्णसंख्या एक हजाराच्या आत

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रातील कोरोना संसर्गाचा आलेख उतरणीला लागला असून, तो हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. दैनंदिन रूग्णवाढ कमालीची खाली आली आहे तर, रूग्ण बरे होण्याचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. राज्यातील ॲक्टिव्ह कोरोना रूग्णसंख्या एक हजाराच्या आत आली आहे. सध्या राज्यात 965 ॲक्टिव्ह कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य विभागाच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आजवर 78 लाख 72 हजार 956 जण कोरोना संसर्गामुळे बाधित झाले आहेत. त्यापैकी 77 लाख 24 हजार 214 जण यशस्वी उपरावनंतर बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 255 जण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 98.11 टक्के एवढा झाला आहे.

महाराष्ट्रात आजवर 1 लाख 43 हजार 772 रूग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. गेल्या 24 तासांत 3 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के एवढा आहे. राज्यात आजवर 7 कोटी 91 लाख 13 हजार 785 प्रयोगशाळा नमुने तापसण्यात आले आहेत.

देशात, गेल्या 24 तासांत 1,685 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 2,499 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशात सध्याच्या घडीला 21 हजार 530 ॲक्टिव्ह  कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशाचा कोरोना रिकव्हारी रेट 98.75 टक्के एवढा झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.