Maharashtra Corona Update : राज्यात आज 1,094 नवे कोरोना रुग्ण, 1,976 जणांना डिस्चार्ज 

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (बुधवारी) 1 हजार 094 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 1 हजार 976 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्येत घट झाली आहे. सध्या राज्यात 12 हजार 410 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या 66 लाख 20 हजार 423 एवढी झाली आहे. त्यापैकी 64 लाख 63 हजार 932 रूग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.63 टक्के झाला आहे.

 

आज राज्यात 17 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, आजवर 1 लाख 40 हजार 447 जण कोरोनामुळे दगावले आहेत. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत 6 कोटी 35 लाख 22 हजार 546 नमूने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 867 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत तर, 1 लाख 33 हजार 262 जण होम क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.