Maharashtra Corona Update : राज्यात आज 6,053 जणांना डिस्चार्ज, रिकव्हरी रेट 94.24 टक्क्यांवर

एमपीसी न्यूज – राज्यात आज, सोमवारी 6 हजार 053 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 17 लाख 89 हजार 958 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.24 टक्क्यांवर पोहोचले आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज दिवसभरात
2 हजार 834 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 18 लाख 99 हजार 352 एवढी झाली आहे. त्यापैकी सध्या 59 हजार 469 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज दिवसभरात राज्यात 55 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत 48 हजार 801 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.56 टक्के एवढा आहे.

राज्यात उद्यापासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत नाईट कर्फ्यु (संचारबंदी) लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून 5 जानेवारीपर्यंत ते लागू राहील.

त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून 14 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ब्रिटनमध्ये आढळून आलेला नवा कोरोना विषाणू वेगाने पसरत असून या विषाणुची घातकता पुढील काही दिवसात कळेल त्यामुळे आजपासूनच राज्यात यासंदर्भात अधिकची सतर्कता बाळगली जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कडक तपासणी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.